धाराशिव (प्रतिनिधी) - विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनेचा निषेध नोंदविला. तर विटंबना टकरणाऱ्या देशद्रोही व्यक्तीस भरचौकात तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (प्रतिनिधी) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.30 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.

 पंजाब राज्यातील अमृतसर येथे एका मातेफिरुने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या स फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रातील संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे महाराष्ट्र राज्य जॉईट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, विद्यानंद बनसोडे जिल्हा संपर्कप्रमुख, रंजीत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सरचिटणीस सिद्धार्थ ओव्हाळ, धाराशिव तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, जिल्हा सचिव लखन ओव्हाळ, प्रवीण बनसोडे, भूम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे, रोजगार आघाडी प्रमुख गौतम कांबळे, शहर संघटन सचिव मुकेश मोठे, पँथर कांबळे, संदीप अंकुशराव, कपिल ओहाळ, मिलिंद सोनवणे, रवी वाघमारे, डॉ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.


 
Top