परंडा (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेबजी दानवे-पाटील दादा यांनी आज परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांचे ठाकूर यांनी स्वागत करून सत्कार केला.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंदभाऊ व्यवहारे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीरभाई चौधरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, भाजपा परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा तालका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद बप्पा रगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, वैद्यकीय आघाडी तालुका संयोजक डॉ. आनंद मोरे, परसराम कोळी, संकेत ठाकूर, धनंजय काळे, मनोज पवार, आदर्श ठाकूर, अमर ठाकूर, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, अर्जुन कैलते, किरण कवठे, विठोबा मदने, मिलिंद शिंदे, गौरव पाटील, राज वळसंगकर, सिद्धीक हन्नुरे, अजीमभाई हन्नुरे, सुरज काळे, आकाश मदने, समाधान कोळेकर, तुषार कोळेकर, महिला मोर्चाच्या ज्योतीताई भातलवंडे, शुभदाताई शेलार तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top