धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष केला. 

महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांची एकजूट करून त्यांना स्वाभिमानाचे बाळकडू देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मराठी जनता ताठ मानेने जगत आहे. त्यांच्या कर्तृत्वाची धमक पाहून दिल्लीचे तख्त देखील अनेकदा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असताना शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात शिवसेना पक्षाचा दबदबा कायम आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तमाम शिवसैनिकांनी पुढे चालवावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top