धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी वरील उद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की,नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. नेताजी असे त्यांना प्रथम 1942 च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिन मधील भारताच्या विशेष ब्युरो मधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक युवकांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्तन करावे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. केशव क्षीरसागर प्रा. माधव उगिले आदिसह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.