भूम (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शिवसैनिकांना तिळगुळ देण्यात आले व ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच मुकबधीर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अल्पोपहार भोजन देवून विद्यार्थ्यांना महिला सेनेतर्फे वही आणि पेन वाटप करण्यात आले
यावेळी भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, उपजिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे,दिलीप शाळू महाराज,मेहर साहेब, शिंदे साहेब, महिला तालुका संघटक उमाताई रणदिवे, सुधीर ढगे, अब्दुल सय्यद,लांडे ताई, अँड प्रकाश आकरे,मिनाताई दिवटे, तात्या कांबळे, अविनाश गटकळ,मनोज पेंटर, श्रीकांत केदारी, राजाभाऊ नलवडे, सुनील गपाट, शहाजी जगदाळे, जावेद तांबोळी, अजीत तांबे, श्रीमंत भडके, दत्ता बोंबले, जयराम शेंडगे,अशोक वनवे,सतीश वारे, कानीफनाथ नलवडे, बाबूराव सपकाळ,रफीक तांबोळी,गणपत डोळस,मनसूक मदने, बाळासाहेब औताडे,गणा मामा शिंदे,विनोद रेडे,अंगद जगदाळे,संग्राम लोखंडे,शंकर गपाट, गायकवाड साहेब, राष्ट्रवादी चे रमेश मस्कर, सर्व शिवसेना ,युवासेना , महिला सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते