तुळजापूर (प्रतिनिधी) -पुणे येथील किर्लोस्कर ऑइल कंपनीचे उच्चपदस्थ अभियंता अधिकारी तथा तुळजापूर येथील रहिवासी श्रीकृष्ण उर्फ दिपक कालिदासराव पाठक वय (45 )यांचे बुधवार दि.15 जानेवारी रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर तुळजापूर येथील घाटशीळ स्मशानभूमी येथे आज गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक व मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. 

अत्यंत मनमिळाऊ,  सुस्वाभावी , उच्चशिक्षित तरुणाचे अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणक ऑपरेटर संतोष उर्फ हारी पाठक यांचे लहान बंधू होत त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. 

 
Top