तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ जयंती रविवार दि. 12 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी  राजमाता माँ जिजाऊ प्रतिमा पूजन माजी नगरासेवक नागनाथ भांजी, सेना शहरप्रमुख सुधीर कदम, जनसेवक अमोल कुतवळ, अध्यक्ष जिजामाता प्रतिष्ठान मधुकर शेळके, महेश चोपदार, राहुल खपले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भांजी, काँग्रेसची युवा नेते अमोल कुतव, शिवसेनेचे शहरप्रमुख सुधीर कदम, मराठा क्रांती मोर्चाचे जीवनराजे रोहित, कुमार टोले, किरण हंगरगेकर, नागनाथ जगताप, राहुल खपले, बबनराव गावडे, शशिकांत कापसे, राजेंद्र आगळे, महेंद्र शिंदे, विजय गवळी, राजकुमार परदेशी, दत्ता सोमाजी, विकास घोडके, रोहित शेंडगे, नानासाहेब टोले, निरंजन वटकर, बालाजी तट, प्रभाकर इंगळे, भैय्या मसलेकर, बापू चव्हाण, मच्छिंद्र माने, युवराज पवार, कुंडलिक देवकर, मुन्ना कदम यांच्यासह जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके, संस्थेचे सचिव महेश चोपदार यांनी केले.

 
Top