तुळजापूर (प्रतिनिधी)-  हजारोंचे मन जिंकणारी स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा असून यातून महाराष्ट्रातील अनेक वक्ते घडत आहेत. यासाठी सदैव सर्वांनी सहकार्याची भावना ठेवावी. असे उद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले. ते युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था आयोजित श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी म्हणाले की, वक्तृत्वामुळे सर्व क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे अशा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे असे सांगितले.  श्रवण अडसूळ महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी व श्रेया कोलते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटगाव या विद्यार्थ्यांनी स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा  2025 चे मानकरी ठरले.

यावेळी जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष विद्या गंगणे, सिने कलावंत शंतनु गंगणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अपराध, जीवन विकास संस्थेचे उपाध्यक्ष ऋषिकेश मगर, गुलचंद व्यवहारे, अमोल कोतवळ, प्राचार्य शशिकांत दोंड, गणेश जळके, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, प्रवीण कदम, जगदीश पाटील, इंद्रजीत साळुंखे उपस्थित होते. प्रस्ताविक महेंद्र कावरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष अमर दाजी हंगरगेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत भागवत, तानाजी म्हेत्रे, शिवशंकर जळकोटे यांनी केले. आभार किरण हंगरगेकर यांनी मानले.


स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी

इ.3 री ते इ.4 थी या गटासाठी प्रथम रोख रुपये 3,500/- चषक व प्रमाणपत्र विजेता हजारे पृथ्वीराज कमलेश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर, काडगाव तालुका तुळजापूर, द्वितीय रोख रुपये 3,000/- चषक व प्रमाणपत्र विजेते कोलते श्रेया बाळासाहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काडगाव तालुका तुळजापूर, तृतीय रोख रुपये 2,500/- चषक व प्रमाणपत्र विजेता गवळी शिवश्री श्रीकांत, नॅचरल इंग्लिश स्कूल, रांजणी तालुका कळंब, चतुर्थ रोख रुपये 2,000/- चषक व प्रमाणपत्र विजेता साळुंखे शरयू नितीन, लोटस पब्लिक स्कूल तुळजापूर, पाचवे रोख रुपये 1,500/- चषक व प्रमाणपत्र विजेती ताटे सोनाली समाधान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केमवाडी, सहावे रोख रुपये 1,000/- चषक व प्रमाणपत्र विजेती घोडके प्रगती शिवाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काडगाव, तालुका तुळजापूर, सातवे रोख रुपये 750/- चषक व प्रमाणपत्र विजेती शेख आलिजा आलीम, मुक्तांगण इंग्लिश स्कूल, तुळजापूर आणि उत्तेजनार्थ 5 प्रत्येकी रोख रुपये 500/- व प्रमाणपत्र व चषक अनुक्रमे बेटकर सृष्टी सदाशिव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घट्टेवाडी, गडदे विघ्नेश बाळासाहेब, अभिनव बालक मंदिर, सांगली, गाडे संस्कार संदिपान, जिल्हा परिषद क्रेंद्रिय प्राथमिक शाळा, नांदुरी, शिंदे पृथ्वीराज भैरवनाथ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर चिंचपूर ढगे तालुका भूम, मगर श्रावणी उमेश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगवी काटी, तालुका तुळजापूर इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटासाठी पारितोषिके प्रथम रोख रुपये 5,000/- चषक व प्रमाणपत्र विजेता उत्कर्ष आप्पासो शेंडगे, सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, द्वितीय रोख रुपये 3,500/- चषक व प्रमाणपत्र विजेता श्रवण शरद अडसूळ, महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी, तृतीय रोख रुपये 2,500/- चषक व प्रमाणपत्र विजेता रोहित सुनील पवार,श्री हवाई मल्लिनाथ महाराज इंग्लिश स्कूल, नंदगाव, तालुका तुळजापूर, चतुर्थ रोख रुपये 2,000/- चषक व प्रमाणपत्र विजेती शिवकन्या लक्ष्मण नवगिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1, सिंदफळ, पाचवे रोख रुपये 1,500/- चषक व प्रमाणपत्र विजेती प्रगती नामदेव नरवडे, सरस्वती विद्यालय, तामलवाडी, सहावे रोख रुपये 1,000/- चषक व प्रमाणपत्र विजेता मंथन धनंजय अडगळे, नरेंद्र आर्य विद्यालय, आपसिंगा, सातवे रोख रुपये 750/- चषक व प्रमाणपत्र विजेती प्रेरणा नितीन गंधुरे, श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालय, धाराशिव आणि उत्तेजनार्थ 05 प्रत्येकी रोख रुपये 500/- व प्रमाणपत्र व चषक अनुक्रमे विजेती संचिता सुभाषराव अष्टेकर, महात्मा फुले हायस्कूल, नांदेड, श्रावणी धनराज सूर्यवंशी, आदर्श प्राथमिक विद्यालय,उमरगा, आवंती ज्ञानेश्वर मुळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नांदुरी, रत्नदीप रवींद्र ओव्हाळ, सुयेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तांदुळवाडी, तालुका बार्शी, दिशा मनोज मुगळे, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव. 

इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी या गटासाठी पारितोषिके प्रथम रोख रुपये 5,000/- चषक व प्रमाणपत्र विजेती प्रणाली शहाजी धस, शिवछत्रपती विद्यामंदिर,पांगरी तालुका बार्शी, द्वितीय रोख रुपये 3,500/- चषक व प्रमाणपत्र वैष्णव संतोष जांबळे, विद्या प्रतिष्ठान मराठी शाळा, बारामती, तृतीय रोख रुपये 2,500/- चषक व प्रमाणपत्र विजेता यशराज आप्पा हेगडे, धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव सातारा, चतुर्थ रोख रुपये 2,000/- चषक व प्रमाणपत्र विजेते वसुंधरा संजय गुरव, समता माध्यमिक विद्यालय, धाराशिव, पाचवे रोख रुपये 1,500/- चषक व प्रमाणपत्र विजेती अनन्या अविनाश जाधव, सरस्वती विद्यालय, तांमलवाडी, सहावे रोख रुपये 1,000/- चषक व प्रमाणपत्र विजेती श्रावणी अंकुश तौर, राजश्री शाहू विद्यालय टाकळी बेंबळी, सातवे रोख रुपये 750/- चषक व प्रमाणपत्र विजेती सारिका संपत जाधव, परिमल विद्यालय लातूर आणि उत्तेजनार्थ 05 प्रत्येकी रोख रुपये 500/- व प्रमाणपत्र व चषक अनुक्रमे राज संदीप लोंढे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सांजा, तन्वी अशोक खडके छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव, प्रगती महेश खलाटे, वसंतराव गोपीनाथ पाटील विद्यालय नांदुरी, तुळसा नागनाथ जाधव, छत्रपती शिवाजी विद्यालय, शहापूर व हरी रामप्रसाद चौरे, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज.

तसेच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट वक्ता “स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा“ प्राथमिक गटात इयत्ता तिसरी ते इयत्ता चौथीसाठी सर्वाधिक गुणानुक्रमे पारितोषिके प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबिकानगर काटगाव या शाळेस कै. दत्तात्रय पांडुरंग गवळी यांच्या स्मरणार्थ फिरती ढाल व डिजिटल प्रमाणपत्र तसेच माध्यमिक गट इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीसाठी सर्वाधिक पारितोषिके प्राप्त शिवछत्रपती विद्यामंदिर, पांगरी तालुका बार्शी या शाळेस माजी जिल्हाधिकारी कै. द.रा.बनसोड यांच्या स्मरणार्थ फिरता चषक व डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले व सर्व गटातून उत्कृष्ट वक्ता दिवसाचा मानकरी “स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा“ मुलांमध्ये श्रवण शरद अडसूळ, महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी तर मुलींमध्ये कोलते श्रेया बाळासाहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटगाव तालुका तुळजापूर यांना पारितोषिक देण्यात आली. स्पर्धा यशस्वीसाठी निरंजन डाके, विशाल सुरवसे, नितीन ढगे, भाग्यश्री कावरे, सुज्ञानी गिराम, संदिप गंगणे, शहाजी कावरे, प्रकाश मगर, मोनिका कावरे, प्रा. समीर माने यांनी परिश्रम घेतले.

 
Top