तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर महाव्दार समोर काही लोकांनी अनधिकृतपणे भाविकांना येण्या-जाण्याच्या रस्त्यावरच नगरपरिषद चप्पल स्टॅन्डच्या बाजूस व मंदिर बाहेरील परिसरात अनधिकृतपणे ओटीचे दुकाने थाटले आहेत. अक्षरशः महाद्वार समोर उच्छाद मांडला असुन, या प्रकरणी कित्येक निवेदने व उपोषण करून देखील श्री तुळजाभवानी मंदिर राजे शहाजी महाद्वार समोरील अतिक्रमण हटवले जात नसल्याच्या निषेधार्थ  मंदीर महाव्दार समोर 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा विजय भोसले यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले  आहे कि, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील राजे शहाजी महाद्वार समोरील काही लोकांनी केलेले अतिक्रमण बाबत मी गेल्या आठवड्यात व त्याआधी देखील शहरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन देत लाक्षणिक उपोषण केले होते. श्री तुळजाभवानी मंदिरासमोर काही लोकांनी अनधिकृतपणे भाविकांना येण्या-जाण्याच्या रस्त्यावरच नगरपरिषद चप्पल स्टॅन्डच्या बाजूस व मंदिर बाहेरील परिसरात अनधिकृतपणे ओटीचे दुकाने थाटले आहेत. अक्षरशः महाद्वार समोर उच्छाद मांडला आहे. या दुकानांमुळे महाद्वार परिसरात अनेक छोटे-मोठे अनाधिकृत फेरीवाले यांचा वावर वाढला आहे. गर्दी पडत आहे. यामुळे गर्दी होऊन दुर्घटना घडू शकते व हे लोक दररोज भाविकांसोबत हुज्जत घालत, दमदाटी करीत असून मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. यामुळेच श्री क्षेत्र तुळजापूरची बदनामी होत आहे. या आधी देखील मी आपल्या मार्फत प्रशासनास वारंवार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या सहित तक्रारी, निवेदने दिले होते व लाक्षणिक उपोषण देखील केले होते. परंतु तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई या अनधिकृत दुकाने थाटलेल्या लोकांवर केलेली नाही. मुख्याधिकारी यांचे व या दुकानदारांचे आर्थिक संबंध असल्याचे यातून संशय निर्माण झाला आहे. याच मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याची बदनामी होऊ शकते. तरी मे. साहेबांना विनंती आहे की सदरील अतिक्रम 25 जानेवारी 2025 रोजी पर्यंत काढून घ्यावे, अन्यथा 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी श्री तुळजाभवानी मंदिरा समोर मी आत्मदहन करणार आहे. असा इशारा विजय भोसले भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष यांनी दिला.

 
Top