तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा मजबुत नसल्याने सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी 30 × 30 चा प्रशस्त गाभारा निर्मिती करावी. अशी मागणी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहर विकास आराखडा अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून, मंदिराला पुरातन स्वरूपात आणण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. देवीच्या गर्भगृहातील मूळ भिंतीवरील मार्बल व त्याखालील स्टाईल काढल्यानंतर मूळ भिंतीच्या दगडांना तडे गेल्याचे आढळून येत आहे. तसेच सदरील भिंत म्हणावी तेवढी मजबुत दिसत नाही. त्या मुळेच पुर्वी मुळ भिंतीच्या सरक्षणासाठी बाहेरच्या बाजूने दूसरी भिंत बांधण्यात आलेली दिसते.
त्या अनुषंगाने आम्ही आपणास नम्र विनंती करतोत की, या सर्व विकास आराखड्याचा आत्मा म्हणजे देवीचे गर्भगृह आहे. या विकास आराखड्यातून सर्व काही मजबूत होईल. शहराच्या चहुबाजूने विकासात्मक कामे होतील. नयन रम्य असे पर्यटन स्पॉट होतील. परंतु मुख्य आत्मा जर कमकुवत राहिला. तर आपण केलेला सर्व विकास आराखडा कवडीमोल ठरेल. त्यामुळे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, आता सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी 30 × 30 चा प्रशस्त गाभारा निर्मिती करावी. म्हणजे पुढील शेकडो वर्षाच्या पब्लिक पॉप्युलेशनच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. तरी आपण याचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले, गणेश क्षिरसागर, श्रीकृष्ण साळुंके यांनी दिले आहे.