मुरुम (प्रतिनिधी)- पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ज्यामुळे समाजात सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी यांची रुजवण होते. सर्व पत्रकार धाडस आणि जिद्द ठेवून प्रत्येक परिस्थितीत सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे. या सत्कार समारंभाचा उद्देश तुमच्या या अमूल्य कार्याला दाद देण्याचा आहे. प्रामाणिक पत्रकारितेचा हा प्रवास असाच चालू राहो, असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रोटरी क्लबचे सचिव सुनील राठोड यांनी व्यक्त केले.
मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात मंगळवारी (ता. 7) रोजी रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे सचिव सुनील राठोड होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी शिवशरण वरनाळे, मुरूम पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर व समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना राठोड म्हणाले की, पत्रकारांच्या अमूल्य योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. पत्रकारांच्या सत्काराचा उद्देश फक्त त्यांचे कौतुक करणे नाही, तर त्यांना प्रोत्साहन देणे आहे. यावेळी कवी शिवशरण वरनाळे, डॉ. रामलिंग पुराणे, प्रा. डॉ. महेश मोटे, रफिक पटेल, बालाजी व्हनाजे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नितीन डागा, प्रकाश रोडगे, शिवकुमार स्वामी, डॉ. सुनील टिकांबरे, विजयकुमार कलशेट्टी, भूषण पाताळे, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन बदोले आदींनी परिश्रम घेतले. शहर व परिसरातील पत्रकार राजेंद्र घोडके, राजेंद्र कारभारी, रफिक पटेल, प्रा. डॉ. महेश मोटे, रवी अंबुसे, मोहन जाधव, बालाजी व्हनाजे, नहीरपाशा मासुलदार, हुसेन नुरसे, अजिंक्य मुरूमकर, इमरान सय्यद, अमोल कटके सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य कल्लया स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार राजेंद्र वाकडे यांनी मानले.