तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील नळदृर्ग रोडवरील सावरकर चौक ते हेलिपॅड या मार्गावर जवळपास सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत. त्यावरील पांढऱ्या कलरच्या पट्ट्या गेल्याने काही दिवसापासून अनेक अपघात होत आहेत. याबाबत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी निदर्शनास आणून दिल्यावर तात्काळ त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी याबाबतची चर्चा केली. आमदार पाटील यांनी तात्काळ काम करण्याचे आदेश दिल्यावर शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी कामास सुरुवात झाली. आमदार पाटील यांनी 24 तासात दखल घेतल्यामुळे त्या भागातील नागरिकांकडून आमदार पाटील यांच्या कामाबाबत कौतुक केले जात आहे.