तेर (प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे, बार्शी तालुका मित्र मंडळ आणि सोलापूर धाराशिव मित्र मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी पुणे, येथे “शिक्षण महर्षी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे“ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तेर येथील कन्या प्रतिभा पद्माकर जगदाळे यांना, “शिक्षण महर्षी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे“ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार खासदार भास्करराव भगरे, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. शेखर गायकवाड, अतिरिक्त जनरल संचालक यशदा पुणे, दिनकरराव जगदाळे, हरिश्चंद्र गडसिंग, रामराव जगदाळे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिभा जगदाळे यांचा सन्मान करण्यात आला.