भूम (प्रतिनिधी)- राज्यात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवक, युवतीसह लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक यांनी भूम येथील सभासद नोंदणी केंद्राला भेट देताना व्यक्त केला.
भूम तालुक्यात प्रत्येक आठवडी बाजारच्या शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम अभियान केंद्र उभारून कार्यकर्ते सभासद नोंदणी करत आहेत. सोमवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी भूम शहरात दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या समोर सदस्य नोंदणी अभियान राबवले. या अभियान केंद्राला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणजी पाठक, लातूर जिल्हा सरचिटणीस सौरभसिंह चव्हाण यांनी भेट देऊन पदाधिकारी - कार्यकर्त्याचे विशेष कौतुक करत संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा आनंदही यावेळी व्यक्त केला.
यावेळी भुम शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान 2025 घेण्यात आलं, यात विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, तालुका युवा अध्यक्ष गणेश भोगील, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, सचिन बारगजे, बाजार समिती सदस्य अंगद मुरुमकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, मुकुंद वाघमारे, सिद्दार्थ जाधव, शुभम खामकर, विजय कसबे, अमित पाटील, आकाश शेटे, संदीप महानावर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.