तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची वाढती गर्दी पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन घडावे यासाठी 1 जानेवारीपासून पुढील वर्षभर म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत देवीचे मंदिर प्रत्येक पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार तसेच रविवारी पहाटे 1 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात

येणार आहे. 

गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने आगामी वर्षभर प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पोर्णिमा व रविवारी या दिवशी मंदिर दर्शनासाठी पहाटे 1 वाजता खुले करण्याची घोषणा केली आहे. या दिवशी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. तर सकाळची पुजेची घाट 6 वाजता होणार आहे. तथापि इतर दिवशी मंदिर पूर्वीप्रमाणेच पहाटे चार वाजता खुले होणार आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार यांनी केला आहे.

 
Top