धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या वतीने मुंबई येथे घेण्यात आलेल्या कॅडेट वयोगटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे ज्युदो पटू ओमप्रसाद निंबाळकर याने 90 किलो पुढील वजनी गटात सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
यासह नाशिक येथे झालेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत ओंकार चौरे याने 100 किलो पुढील वजनी गटात रौप्य पदक तर ओमप्रसाद निंबाळकर याने 100 किलो खालील वजनी गटात कास्यपदक पटकाविले आहे. राज्य स्पर्धेतील जुदोपटूंची कामगिरी जिल्ह्यातील उदयन्मुख ज्युदोपटू साठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष वैजिनाथ घोडके, उपाध्यक्ष अमर सुपेकर, सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अशोक जंगमे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, रवींद्र जाधव, प्रभाकर जाधव, स्पर्धा विभाग प्रमुख प्रतापसिंह राठोड, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, प्रशिक्षक साई राठोड यासह संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.