तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हयात पवनचक्यांसाठी लागणारी वर्षभर  उच्चपवनगती  प्राप्त  असल्याने येथे पवनचक्या निर्मीती कंपन्यांनी  पवनचक्या मोठ्या संखेने उभारल्या जात आहेत.पवनचक्यामुळे पैसा आला त्यातुन  तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे.

पवनचक्की उभी करताना शेतजमिनीचा औद्योगिक अकृषक परवाना लागतो. ते परवाने कसे काय तात्काळ मिळतो. पवनचक्कीचे ठेकेदार मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन करतात  ते याचा महसुल पुर्ण भरतात का? पवनचक्की कंपन्याना तात्काळ परवाने कसे काय मिळतात हे शोधाचे विषय आहेत.

तुळजापूर तालुक्यात नुकत्याच जवळगा मेसाई येथे दोन दहशत निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामुळे तालुक्याची शांतता धोक्यात आली आहे. पवनचक्कीमुळे पुण्यातील नामचीन गुंडाचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा आहे. या पवनचक्की प्रकरणाची झळ पोलिस, महसुल प्रशासनाला बसु लागली असुन हे पवनचक्की प्रकरण राज्यात चर्चित झाले आहे.

1 मेगावँट पवनचक्की उभारणीसाठी 2 ते 3 एकर जमिन लागुन चार ते पाच कोटी खर्च येतो. यातुन 8 ते 10 लाख युनीट व 3 मेगावँट पवनचक्कीतुन 25 ते 30लाख युनिट निर्मिती होती. ही वीज राज्य वितरण कंपन्या व खाजगी औद्योगिक कंपन्या विकत घेवुन वितरण करतात. एकदा पवनचक्की उभारली कि त्यातुन काहीकाळ उत्पन्न मिळते. 

पवनचक्कीतुन वीज ही वा-यातुन निर्माण होते. वारा टर्बाईन ब्लेडवर आदळतो. त्याब्लेड चालु होवुन वीज तयार होते. पवनचक्कीतुन स्वच्छ व कमी दरात वीज मिळते. यातुन चांगले उत्पन्न मिळत असल्याने पैसा आला की गुंडगिरी येते. त्याचाच परिपाक तुळजापूर  तालुक्यात गुंडगिरी घटनेत वाढ होवुन झाली आहे. या पवनचक्की उभारताना कंपन्यांनी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच जमिनी खरेदीसाठी  दलाल व सुरक्षेसाठी गुंड याचा आधार घेतल्याने आज तालुक्यात शहरी भागासारखी ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत चालली आहे. येथे शेतकरी कंगाल होवुन अधिकारी, दलाल मालामाल झाले आहेत. या पवनचक्की प्रकरणी अन्यायाची दखल तात्काळ घेतली नसल्याने अनेक शेतकरी कुंटुंब देशोधडीला लागले आहेत.


 
Top