धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिन व धाराशिवचे ग्रामदैवत हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या उरूसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण आठशे रूग्णांची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे यांच्या पुढाकाराने शनिवार, 18 जानेवारी रोजी भीमनगर येथील शिंगाडे वाडा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक दाजी ओव्हाळ, शेषेराव सोनवणे, सत्तार शेख, बन्सी कुचेकर, धनंजय वाघमारे, सिद्राम वाघमारे, अलाउद्दीन पठाण, डॉ. अजित डिकले, डॉ. दीपक निंबोणकर, डॉ. नागेश वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात डॉ. आदिती आश्री, डॉ. शितल पिसाळ, डॉ. सागर सोनटक्के, डॉ. किरण देशमुख, डॉ. सुरज रणशूर, सुनिता सस्ते, ज्योती कदम यांनी रूग्णांची तपासणी केली. रूग्णांची तपासणी करून गरजू रूग्णांना औषधे, चष्मे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी विशाल शिंगाडे, रवींद्र सूर्यवंशी, सुगत सोनवणे, अविनाश शिंगाडे, लहू बनसोडे, नागराज साबळे, योगेश वाघमारे, प्रज्ञावंत ओव्हाळ यांनी अवयवदानाचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश वाघमारे, शुभम शिंगाडे, गौरव धावारे, लहू बनसोडे, सारीपुत शिंगाडे, सतीश शिंगाडे, उमाकांत माळाळे, प्रितम शिंगाडे, शैलेश शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.