तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कवयित्री शांता सलगर यांना कै.चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक नरहरी बडवे यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील कला, साहित्य,क्रीडा,वृक्षमित्र, लेखक अशा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलेला 2023 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, मानपत्र,अकराशे रुपये,फेटा,शाल असे स्वरूप आहे.25 जानेवारीला एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक नरहरी बडवे यांनी दिली.