धाराशिव (प्रतिनिधी)- लोक आंदोलन न्यासाच्या संघटनेत कार्यरत असलेल्या मनोज खरे यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गांधीजींच्या विचारांवर आधारित बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास आणि भ्रष्टाचार विरोधी कार्य करणाऱ्या लोक आंदोलन न्यासाने महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी मनोज खरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आगामी एक वर्षासाठी ते जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहतील. या पदाचा कार्यभार स्विकारून जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याचे काम ते लवकरच सुरू करतील. मनोज खरे यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात संघटनेची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच या संघटनेत ज्यांना समाजहिताचे काम करण्याची इच्छा किंवा भ्रष्टाचार कमी करण्याचा विचार येतील अशा नागरिकांनी आमच्याशी सम्पर्क करावा असे आव्हान मनोज खरे यांनी केले आहे. धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी अण्णा हजारे कार्याध्यक्ष कल्पना इनामदार मॅडम आणि विश्वस्तांचे आभार मानले आहेत. 

 
Top