भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा च्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी रोहन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी धाराशिव भाजपा जिल्हा चिटणीस अंगद मुरूम कर,वाशी भाजपा तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे,कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सचिन बारगजे,माझी जिल्हा सरचिटणीस आदम शेख, माजी भूम तालुका उद्योग आघडी अध्यक्ष रमेश बगाडे,वाशी तालुका कोषाध्यक्ष सुहास चौगुले,भाजपा कार्यकर्ते अमोल बोराडे,युवा मोर्चा कार्यकर्ते संदीप महानवर,अमित पाटील,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.