धाराशिव (प्रतिनिधी)-  समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक आहे. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार सजग राहून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कार्यरत रहावे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा देखील वापर होत आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे पत्रकारिता देखील विस्तारत होत आहे. असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. 

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सोमवारी दि.6 जानेवारी रोजी धाराशिव येथे आयोजित प्रतिमा पूजन व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर संघाचे राजाभाऊ वैद्य, सरचिटणीस संतोष जाधव, संतोष हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना जिल्हा माहिती अधिकारी खडसे म्हणाले, बदलत्या काळनुसार आता अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शासन समाजासाठी विविध योजना राबविते. पत्रकारांनी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता करून समाजातील वातावरण शांत व चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावेत. चुकीच्या गोष्टी समाजासमोर मांडाव्यात. आपली आदर्श पत्रकारिता लोकांसह शासनापर्यंत पोहचवावी. यावेळी अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे लवकरच वितरण करणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी दिली.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष हंबीरे,  सुत्रसंचालन पत्रकार भैरवनाथ कानडे तर आभार प्रदर्शन संघाचे राजाभाऊ वैद्य यांनी केले.  कार्यक्रमास संघाचे श्रीकांत कदम, अब्बास सय्यद, सुभाष कदम, सुरेश घाडगे, प्रमोद कांबळे,  गौतम चेडे, इक्बाल मुल्ला, संतोष शेटे, प्रवीण पवार, उपेंद्र कटके, प्रशांत कावरे, राहुल कोरे, सुरेश कदम, प्रा. सतीन मातणे, सुरेश कदम, शरद गायकवाड, प्रशांत गुंडाळे, पत्रकार अशोक दुबे, निजाम शेख, बालाजी लोखंडे, आदम पठाण, रामचंद्र गायकवाड, वाघमारे, मोहसीन पठाण, शाहरूख सय्यद आदींसह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. 

 
Top