तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरामध्ये संस्थानच्या स्वनिधीतून पुरातत्व विभागाकडून करावयाची विविध विकासात्मक कामे सुरू असून, धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबसे आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची याबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
बैठकीमध्ये पुरातत्व विभाग तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विकासकामे करताना येणाऱ्या प्रत्यक्षातील अडचणींबाबत सूचना दिल्या. काम पूर्ण करताना कामाचे विविध टप्पे आणि त्यासाठी लागणारी कालमर्यादा निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने काम लवकरात लवकर कसे करता येईल याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी विकासकामांची पाहणी केली.
यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिराचे महंत तुकोजीबुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिराचे महंत तुकोजीबुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते.