धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची पगार दुप्पट करण्याबाबत आम आदमी पार्टी धाराशिवच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील गृह खात्यांनी राज्यातील पोलीस दलाकडून अनेक महत्त्व पूर्व काम करून घेते. जसे कायदा सुव्यवस्था राखूना ठेवणे, सुरक्षा, दंगल, मोर्चे, उपोषण, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना पोलीस प्रशासन कडून राज्याच्या हितासाठी सतत दिवस-रात्र सक्षमपणे कार्य करत असतात. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर नंतर पोलिस कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा आहे. नागरिकांसाठी ते 24 तास कार्यरत होते. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधे सह त्यांना प्रवास मोफत करण्याची तसेच कर्मचाऱ्यांना घरे बांधण्यासाठी शासनाकडून बिनव्याजी मदत करण्याची मागणी आम आदमी पार्टी कडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांनी देण्यात आले आहे. निवेदनावर आम आदमी पार्टी जिल्हाउपाध्यक्ष मधुकर शेळके, तुळजापूर शहर अध्यक्ष किरण यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.