धाराशिव (प्रतिनिधी)- श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू व सकल संत विचार समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने श्री संत चोखामेळा सेवा पुरस्कार  सचिन पाटील यांना जाहीर करण्यात आलेला आहे. हा संत तुकाराम महाराज देहू संस्थान व सकल संत विचार समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात आलेला पहिल्या पुरस्कार आहे. 

तर हा पुरस्कार श्री संत चोखामेळा महाराज, तुकया बंधू कान्होबाराय गाथा पारायण सोहळ्यात श्री क्षेत्र देहू येथे 12 जानेवारी रोजी हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, प्रा. डॉ. सदानंद मोरे व आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी श्री क्षेत्र देहू संस्थानाचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप माणिक मोरे महाराज, हभप संजय मोरे महाराज, हभप भानुदास मोरे महाराज, हभप विशाल मोरे महाराज, हभप संतोष मोरे महाराज व हभप अनिल मोरे आदी उपस्थित होते. सचिन पाटील यांना हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


 
Top