धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी या शाळेमध्ये चिमुकल्यांचा बाल आनंद मेळावा भरवण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीच्या अध्यक्ष संजीवनी बाबासाहेब पौळ, उपसरपंच कृष्णा गाडे व उपाध्यक्ष अफसाना सलीम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळण्यासाठी तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष व्यवहार विद्यार्थांना कळवा म्हणून हा बाल मेळावा भरवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील ऑनलाईन आर्थिक व्यवहाराचे मिळावे म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या स्टोल समोर स्कॅनर लावले होते, पालक खरेदीनंतर या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणाऱ्याचे लक्ष वेधत होते. आधुनिक जगात कॅशलेस व्यवहाराचे ज्ञान व्हावे व प्रत्येक नागरिकांस ऑनलाईन आर्थिक व्यवहार कळावा हा संदेश विद्यार्थांनी दिला. या आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील एकूण 110 स्टॉल लावण्यात आले यामद्ये विविध पालेभाज्या, फळे, नाश्त्याचे व जेवणाचे पदार्थ, चविष्ठ भेळ, नूडल्स, मनोरंजनाचे साहित्य असे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. यामधून 27,500 रुपयांची उलाढाल झाली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय नांदे, प्रवीण बप्पा वीर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महेश वीर, पोपट कोळी, अनिता आकाश पौळ, उषा राम यादव, रोहिणी शिवलिंग चौगुले व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक ज्ञानेश्वर निंबाळकर ,निलेश निंबाळकर,चंद्रशेखर वीर,आणासहेब राऊत,संजय थोडसरे,निलेश निंबाळकर, वैभव वीर, प्रशांत म्हेत्रे, उमेश चौगुले, राम यादव, सुनील माळी, सुनील काळे,नवनाथ गाडे, संभाजी माळी, उमेश चौगुले, सचिन खोबरे, सतीश कदम, आयुब शेख, सद्दाम सय्यद, राहुल कोरे, तात्यासाहेब वीर आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डोंगरे मॅडम, कराड मॅडम, म्हेत्रे मॅडम, मते मॅडम, ढगे मॅडम, नरवटे मॅडम, वीर मॅडम, पेठे सर, काळे सर, माने सर, कचरे सर यांनी परिश्रम घेतले.