तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील सारोळा येथील ग्रामपंचायत मधील भष्ट्राचार बाबतीत कारवाई न केल्यास चार ग्रामपंचायत सदस्य 26 जानेवारी सकाळी 10.00 वाजता आत्मदहन करण्याचा इशारा  मुख्याधिकारी जिल्हा परिषद, धाराशिव यांना चार ग्रामपंचायत सदस्य सारोळा यांनी दिला आहे.

सारोळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाने सहमतीने 38 लाखाचा शासनाचा निधी कामे न करता उचलला आहे. परंतु पंचायत समितीच्या तपासणी अहवालात नऊ लाखाचा भ्रष्टाचार झालाय असे लेखी अहवाल दिला. परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत सदस्य चार जण दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या दालनात त्यांच्यासमोर आत्मदहन करणार आहोत. आमचे काही बरे वाईट झाले तर आपण त्याला सर्वस्वी जबाबदार राहाल. तरी भ्रष्टाचारावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावे व शासनाचा निधी कामे न करता उचलला ते त्यांच्याकडून सव्याज भरून घ्यावे ही विनंती या अर्जावर ग्रामपंचायत सदस्य त्रिशला विनोद पाटील, निकिता सुशील धनके, अंबिका उषाकांत मंडवळे, प्रवीण विठ्ठल नागदे यांच्या स्वाक्षरी आहेत.

या अर्जाच्या प्रति मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी धाराशिव, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव, आमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर, पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांना दिले.

 
Top