भूम (प्रतिनिधी)- परमार्थाच्या वृक्षाला विचाराच पाणी घाला. फळ मिळण्याची खात्री आहे. जस कर्म तसच फळ मिळत. प्रत्येकाला चांगल्या फळाची अपेक्षा असेल तर चांगले कर्म करत राहा असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनसेवेत हभप परमेश्वरीताई परभणे महाराज यांनी केले.
येथील समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सव - 2025 निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दि. 6 जानेवारी 2024 रोजी हभप परमेश्वरीताई परभणे चकलांबा यांची कीर्तन सेवा झाली. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन सेवे दरम्यान हभप परमेश्वरीताई परभणे यांनी अधिक वेळ घेऊन भाविक भक्तांना कीर्तन सेवेतून प्रबोधन करत समाजाला साधू संतांच्या विचाराची आणि वारकरी संप्रदायाची नितांत गरज आहे हे पटवून दिले. श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 5 जानेवारी ते 13 जानेवारी रोजी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. अखेर समाप्तीच्या दिवशी संपूर्ण शहरातून शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विविध कार्यक्रमाने मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाप्रसादाने सांगता होणार आहे.