भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर दिनांक 1 जानेवारी 2025 पासून मोजे वालवड येथे आयोजित केले होते. त्या समसंस्कार शिबिराचा दि. 7 जानेवारी रोजी यशस्वीरित्या समारोप झाला.
श्रमसंस्कार शिबिराचा समारोप करता वेळेस कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी चंदनशिव सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ पाथरूड ते सहसचिव प्राचार्य संतोष शिंदे, डॉ. सुयोग अमृतराव (डायरेक्टर ऑफ मॅनेजमेंट डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव), वालवड येथील सरपंच पांडुरंग देऊळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते, हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डि.व्ही शिंदे, आय क्यू सी कॉर्डिनेटर डॉ. जगदाळे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक इनामदार सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागता पासून झाले. त्यानंतर. प्राध्यापक गिरी मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.