तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ देविच्या वारादिवशी मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी मोठी गर्दी झाली होती. सुट्या, लग्नसराई, शालेय सहल पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी प्रचंड थंडी असताना पहाटे पासुन देवीदर्शनार्थ प्रचंड गर्दी झाली.
श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर भाविकांनी प्रसाद साहित्य, फोटो खरेदी साठी बाजारपेठेत गर्दी केल्याने भाविकांनी बाजार पेठ बहरुन गेली होती. मंदीर परिसर, भवानी रोड, आर्य चौक, शुक्रवार पेठ या प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणे मोठ्या संखेने झाल्याने भाविकांना मंदिरात ये- जा करताना कसरत करावी लागत होती.
दंड फाडुन ही वाहतुक कोंडी
भवानी रोडवर मोठ्या प्रमाणात दुचाकी लावल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी व दुचाकींना सक्त ताकीद देणे आवश्यक आहे. परंतु वाहतूक पोलिस मात्र बेशिस्त लावण्यात आलेल्या दुचाकींना दंड फाडण्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहेत.