तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील सहाव्या माळेदिनी पौष शुक्ल पक्ष 14 चतुर्दशी क्रोधी नाम संवत्सरे शके 1946 रविवार दि. 12 रोजी देविजी सिंहासनावर महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
महिषासुर मर्दीनी पुजा मांडण्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितले जाते कि, साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासूरमर्दिनी ह्या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते.