तुळजापूर (प्रतिनिधी)- पञकार सुरक्षा समितीच्या धाराशिव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. धाराशिव जिल्हाध्यक्षपदी राहुल कोळी, रुपेश डोलारे जिल्हा उपाध्यक्ष, संजय गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष, सर्जेराव गायकवाड जिल्हा संघटकपदी, अहमद अन्सारी सह संघटकपदी त्याचबरोबर तुळजापूर तालुका

कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. 

तुळजापूर तालुकाध्यक्षपदी चांद शेख, तालुक उपाध्यक्ष सारिका चुंगे, तालुका कार्याध्यक्ष, हैदर शेख तालुका सचिव पदी, मकबूल तांबोळी तालुका संघटक प्रशांत गरड, तालुका सहसचिव गणेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे व सदस्य पदी राम थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष बाथम, प्रदेश संघटक गणेश जाधव, मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस, संघटक मिर्झागालिब मुजावर, कार्याध्यक्ष तानाजी माने, सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे,  कार्यकारी जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, जिल्हा संघटक सादिक शेख,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top