धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

स्वराज्य शिल्पकार,राष्ट्रमाता,राजमाता, स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांची जयंती रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, भूम, धाराशिव उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अराफत काझी,ओबीसी सेल जिल्हा सचिव नारायण तुरुप,आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

 
Top