भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलात च्या स्थापनेचे अवचित्य साधून दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भूम पोलीस स्टेशन येथे श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना रेझिंग डे निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.भूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अख्तर सय्यद यांनी पोलिसांच्या वापरात असलेल्या बंदुका, रायफल या विषयीसविस्तर मार्गदर्शन केले. 

अश्रूबाम अशा विविध शस्त्राचे यांची माहिती तसेच पोलीस स्टेशन मधील कामकाज, गुन्हे त्यांचा तपास तसेच पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. सर्वांना सर्वतोपरी सुरक्षा पुरून सगळीकडे शांतता ठेवण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या याबाबत विद्यार्थ्यांनी सखोल मार्गदर्शन केले. भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच भूम पोलीस स्टेशनचे पोलीस कॉनेस्टेबल करणराज राव यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


 
Top