धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी वरील उद्गार काढले.
सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयातील महिला प्राध्यापक यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी आपले पती क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्यासोबत काम करून भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.आणि त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला यशस्वीपणे कार्य करत असल्याचे दिसून येतात. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.