धाराशिव (प्रतिनिधी) -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय लोकशाही दिनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देष देण्यात आलेले आहेत.या निर्देशांचे काटेकोर पालन करावे,अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिल्या आहेत.

 जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.तसेच तालुकास्तरावर दर महिन्याचे तिस-या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तथापि या दिवशी सार्वजनिक सुटटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल,असे नमुद केले आहे.

नागरिकांचे प्रश्नाचे निराकरण करणेसाठी प्रत्येक महिन्याचे तिस-या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन तहसिलदार यांनी करावे.तसेच लोकशाही दिनाचे नियोजन व संचलन कार्यपध्दती ही संदर्भ क्र.०१ व २ मध्ये दिलेल्या शासन परिपत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक आहे.

तालुका स्तरावरील लोकशाही दिनाची नियमितपणे तिस-या सोमवारी तहसिलदार यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  सर्व कार्यालय प्रमुख स्वतः उपस्थित राहतील याबाबत दक्षता घ्यावी.प्रत्येक लोकशाही दिनाचे इतिवृत्त तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावे, याबाबत कुठल्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व तहसलिदार यांनी तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरीकांच्या प्रश्नांचे निराकरण करावे.उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील तहसिल कार्यालय स्तरावरील लोकशाही दिनास एका तालुक्यात उपस्थित राहुन लोकशाही दिनास मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. तसेच सर्व नागरिकांनी आपल्या अडीअडचणीबाबत लोकशाही दिनास उपस्थित राहुन आपले प्रलंबित प्रश्न प्रशासनाकडुन कार्यवाही करुन घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्री.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 
Top