धाराशिव (प्रतिनिधी) -रस्ता सुरक्षा अभियान 2025 प्रवाह अंतर्गत परिवहन कार्यालय धाराशिव येथे नुकतेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता विविध कार्यक्रम राबविले जातात.त्यामध्ये चालकांची नेत्र तपासणी शिबीरे घेतले जातात. डॉ.ज्योती कानडे नेत्ररोग तज्ञ व डॉ श्रीकांत कल्याणी यांनी आपल्या जीवनामध्ये डोळयांचे जडआजाराचे उपचाराबददल मार्गदर्शन केले.वाहन चालकांची दृष्टि चांगली असणे जरूरी आहे.कारण आपले जीवन त्यांच्या हातात आहे. वाहन चालकांची अनेक आजारामुळे दृष्टि कमी होत चालली आहे.त्यामध्ये मोतीबिंदूचे प्रमाण जास्त असल्याने दृष्टि कमी होते.म्हणून वाहनांचे कंट्रोल आपल्या हातून सुटू शकते. शिबीरामध्ये चालक-मालक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांनी वाहन चालकांनी महिन्यातून एकदा तरी आपले डोळे व बी.पी.तपासणी करावा व वाहन चालविताना सीट बेल्ट,हेल्मेट या वापर करावा व बिगर लायसन्स न घेता वाहन चालवू नये, स्कूल बस वाहतुक संघटनेचे अध्यक्ष दादाराव गवळी व त्यांचे सहकारी यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने शाळेतील मुलांना स्कूल बसमध्ये चढताना उतरताना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देत आहोत.पालकांनी पण लक्ष द्यायला हवे की,आपले पाल्य शाळेत सुरक्षित जातो की नाही याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
अजमेरा रोटरी नेत्र रूग्णालय धाराशिव येथील नेत्र सहायक शिवरूद्र इसाके व जिल्हा रुग्णालयाचे लॅब अॅसिस्टंट एस.बी.शिंदे यांनी शिबीर कार्यालयामध्ये ७५ चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.शिबीरास कायालर्यातील मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी गालिदे,सतिश धुंदे,सहायक मोटर वाहन निरीक्षक सागर काशविद कुणाल होले,अजित पवार तसेच कार्यालयातील कार्यालयाचे मुख्य लिपीक धनंजय लोंढे व त्यांचे सहकारी कर्मचारी,वरिष्ठ लिपीक आर.जी. कुलकर्णी,आर.पी.नाईकवाडी,डी.सी पुदाले,ए.आर.राऊत व कनिष्ठ लिपीक बालाजी वाघमारे,अरविंद गरड,संध्याराणी गवाड,करीष्मा लोहार,अपर्णा राठोड व शिपाही दत्तू सरपे आदी उपस्थित होते. शिबीर कार्यक्रमाचे संचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार यांनी केले व श्री कुणाल होले सहायक वाहन मोटार निरीक्षक यांनी आभार मानले.