धाराशिव (प्रतिनिधी) -शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सोनाई फंक्शन हॉल मध्ये शनिवार संगीत मंडळाचा रौप्य महोत्सव वर्षा निमित्त संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते एक दिवसीय समारोहातील गायन, सत्तारवादन व संवादिवनीवरील सहवादमाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर कलाकार व मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवर कलाकारांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पुणे येथून आलेल्या सौ शिल्पा आठल्ये यांनी आपल्या गायनाची सुरुवात श्री रागातील गायनातून कार्यक्रमाचा श्री गणेशा केला विलंबित झपताल व दृत तीनतालातील बंदिशी गाऊन त्यांनी एका भक्ती गीताने आपल्या गायनाचा समारोप केला व आपल्या सुमधुर गायनाने श्रोत्यांना एक तासभर खेळून ठेवले त्यांना संवादिनीवर सुरेश फडतरे व तबल्यावर हनुमंत फडतरे तानपुऱ्यावर वरून जोशी यांनी साथ केली
दुसऱ्या सत्राची सुरुवात अनोख्या अशा सहवादनाने झाली त्यामध्ये पुणे येथील कल्याणी देशपांडे यांनी सतारवादन व धाराशिव जिल्ह्याची भूमिपुत्र सुरेश फडतरे यांनी राग चारुकेशी सादर केला सतार व संवादिनी यांची जुगलबंदी अत्यंत सुमधुर झाली विलंबित रूपक तालात व द्रुत तीनतालात चारुकेशी रागातील बंदीशी त्यांनी सादर केली कल्याणी देशपांडे यांनी श्रोत्यांच्या आग्रहास्तव पहाडी धून व सिने संगीत सतारीवर सादर करून श्रोत्यांची फर्माईश पूर्ण केली त्यांना तबल्यावर श्री हनुमंत फडतरे यांनी उत्तम साथ केली दरम्यान मंडळातील सन्माननीय सदस्यांनी गेली 25 वर्ष सातत्याने संगीत सेवा केली म्हणून त्यांना प्रमुख कलाकराच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात हुबळी येथील प्रख्यात गायक पं. कृष्णेंद्र वाडीकर यांच्या दमदार आवाजातील गायनाने राग मारू बिहाग सादर केला त्यांनी विलंबित एकताला मध्ये बडा खयाल व द्रुत तीनतालामध्ये छोटा खयाल सादर केला त्यानंतर एक तला मधील शहाणा रागाची बंदिश गाऊन एक कानडी भजन सादर केले कार्यक्रमाची सांगता त्यांनी भैरवीतील बंदिश व भजनाने केली हार्मोनियमची साथ सुरेश फडतरे तबला साथ अरुण जोशी व पखवाजाची साथ आसाराम साबळे यांनी केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य सिद्धेश्वर जोशी यांनी केली व प्रास्ताविकात संगीत सेवेतील कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा प्रेक्षकांसमोर ठेवला संगीत समारंभासाठी धाराशिव नागरी सह पंचक्रोशातील सुज्ञ जाणकार श्रोत्यांनी उपस्थित राहून संगीत पर्वणीचा आनंद घेतला त्याबद्दल मंडळाचे सदस्य डॉ श्रीकांत कवठेकर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच मंडळाच्या सुमधुर भोजनाची व्यवस्था केली होती त्याचा सर्व उपस्थितानी आस्वाद घेतला