धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, याच अनुषंगाने मुरूम, ता.उमरगा येथे सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले.बसवराज पाटील यांच्या सह सर्व उपस्थितांनी सदस्यता नोंदणी केली. 

संपूर्ण महाराष्ट्रभर या अभियानाला प्रचंड यश मिळत असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी योगदान देण्याच्या बसवराज पाटील यांनी सूचना केल्या.

यावेळी यावेळी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष बापूरावजी काका पाटील, मा.सभापती सचिन पाटील,  गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष रशिद शेख,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,देवेंद्र कंटेकूरे, अनिल सगर, विक्रम मस्के, नगरसेवक महेश माशाळकर, परमेश्वर टोपगे, संचालक विजय सोनकटाळे,महालिंग बाबशेट्टी,विरभद्र बरबडे,अप्पू गुंजोटे, सिद्राम बालकुंदे, राजूभाई मुल्ला,शिवशंकर नागोबा,ताशकंद टेलर,फैजान मुल्ला उपस्थित होते. 

 
Top