भूम (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टीची सदस्य नोदणी अभियान भूम तालुक्याच्यावतीने गोलाई चौक या ठिकाणी राबवण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . चार तासाच्या अभियानातून तब्बल 483 नागरिकांनी सदस्य होऊन पक्षावरील श्रद्धा दाखवून दिली आहे .

संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीचे 2025 सदस्य नोंदणी अभियान 5 जानेवारी 2025 रोजी राबविण्यात आले . भूम तालुक्याच्यावतीने भूम शहरातील गोलाई चौक या ठिकाणी माजी मंत्री आमदार राणा जगजीतसिंह पाटील , माजी आमदार  सुजितसिंह  ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली व भूम - परंडा - वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या नेतृत्वात राबवण्यात आले . हे सदस्य नोंदणी अभियान 15 जानेवारी अखेर पर्यंत चालू राहणार आहे. 

 यावेळी भाजपचे तालूका अध्यक्ष महादेव वडेकर,  सरचिटणीस संतोष सुपेकर,  शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, युवक तालुका अध्यक्ष गणेश भोगील,  अतुल तिकटे,  गजेंद्र धर्माधिकारी पाथरुड,  सिद्धार्थ जाधव,  मुकूंद वाघमारे , कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्य सचिन बारगजे,  लक्ष्मण भारे,  संदीप खामकर, हरिश्चंद्र  उबाळे ,  बाजार समिती सदस्य अंगद मुरूमकर , जनसेवा बँकेचे संचालक बाबुराव खरात,  तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .


 
Top