तुळजापूर (प्रतिनिधी)- -  शहरातील पापनास तीर्थ   परिसरातील  विवेकानंद नगर येथे  आयोजित   श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा आरंभ मंदिर संस्थांनचे महंत श्रीतुकोजीबुवा यांच्या शुभहस्ते  रविवार दि १९रोजी देवदेवतांचे पुजन करुन करण्यात आला 

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने मागील नऊ वर्षापासून  देणगी  न घेता  देणगी मुक्त अखंड हरिनाम सप्ताह  साजरा केला जातो,

तुळजापूर मध्ये देणगी मुक्त सप्ताह म्हणून याची वेगळी ओळख आहे.  रविवारी सकाळी महंत तुकोजी बुवा यांच्या  हस्ते श्री कलश ग्रंथ व्यासपीठ श्रीराम प्रतिमा मृदंग टाळ पूजन करून सप्ताह सुरुवात झाली 

यात काकड आरती  भगवत गीता हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन धार्मिक  गीत गायन व तसेच रात्री प्रसिद्ध कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तन सात दिवस चालणार आहे. तसेच ह भ प वैभव महाराज कानेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने  रविवार दि२६ रोजी सप्ताहाची  महाप्रसादाने सांगता होणार आहे. तरी सर्व तुळजापूर शहरातील नागरिकांनी यांच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आयोजक श्री विजय सर गंगणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर यांनी केले आहे.

 या सप्ताह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मनोज आप्पा गवळी, सुशांत हत्तीकर  प्रहर्ष बरुरकर ताती कदम भारतराव चौधरी  आकाश माने अश्रू माने उत्कर्ष डोंगरे दादा दळवी विलास रेणके अभिजीत रेणके बापू वैरागे  दादा कदम खानदेश वाघमारे तसेच सर्व पापनास नगर मधील जेष्ठ तसेच पापनास तीर्थ भजनी मंडळ हे सर्व अहोरात्र परिश्रम घेत आहे.

 
Top