धाराशिव (प्रतिनिधी) -सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी एक लाख रूपयाची मागणी करून 50 हजार रूपयांची लाच स्विकारताना तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर देवकर यांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 21 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांच्या घर झडतीत 20 ग्रॅम सोने, 13 हजारांची रोकडे आणि त्यांच्ा नावे कार असल्याचे समोर आले आहे. तामलवाडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुरज देवकर यांच्याकडे एका गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. तपास अधिकारी यांना सांन नमूद तक्रारदारास गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 1 लाख रूपयांची मागणी केली. यापैकी पहिला हप्ता 50 हजार रूपये स्विकारताना देवकर यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी देवकर यांच्यावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.