भूम (प्रतिनिधी)-  दि. 30 डिसेबर रोजी हिवरा येथील शिवाजी शहाजी जगदाळे यांनी त्यांचे जनावरे हिवरा गावाजवळील डोंगरात सकाळी चरण्यासाठी सोडले होते. त्यावेळेस बिबट्या सदृश्य प्राण्याने गायीवर व बैलावर हल्ला करून दोन गायीना ठार केले असून बैलाला जखमी केले आहे. 

अधिक माहिती अशी की भूम तालुक्यात मागील दीड महिन्यापासून बिबट्या वावरत असून, वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू असून अद्यापही बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. मागील महिन्यात मात्रेवाडी येथील शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला होता व इतर ठिकाणी मुक्या जनावरांना बिबट्याने ठार केले होते. त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाच्या वतीने त्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र तालुक्यात सध्या बिबट्या फिरत असून मुक्या जनावरांना शिकार करत आहे. तालुक्यात डोंगराळ भाग असल्यामुळे व ज्वारीचे पीक उंच झाल्यामुळे बिबट्या कुणीकडे जात आहे हे दिसत नाही. अचानक मुक्या जनावरांवर हल्ला करत आहे. त्यामुळे वन विभागाला बिबट्या जेर बंद करण्यात अडचणी येत आहेत.

 
Top