कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ईटकूर  येथे दि. 31 डिसेंबर रोजी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संवाद या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) गुड टच, बॅड टच बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण, बालकामगार, बालगुन्हेगारी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिक्षणातून आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी प्रेरित केले. या वेळी शाळेत विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 
Top