धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांचा युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाची डिलीट पदवी मिळाल्याबद्दल अर्थशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.डॉ.मारुती लोंढे हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून सूक्ष्म अर्थशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हा अत्यंत कठीण विषय ते खूपच सोपा करून त्या विषयाचे अध्यापन करतात. सूक्ष्म अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. (भाग एक) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन डॉ. लोंढे यांचा सत्कार करण्यात आला आहे. या सत्कार बद्दल डॉ.मारुती लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top