उमरगा (प्रतिनिधी)- एसटीची भाडेवाढ ही सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असून भाडेवाढ मागे घ्यावी. या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
एसटीचे 15% दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर दि. 27 जानेवारी रोजी सकाळी एक तास शिवसेना उबाठा गटाच्यावतीने चक्काजाम आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद होता. एसटी वाहतूक ही बंद होती. यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, एसटी भाडे वाढ ही जनतेवरील कारक आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही भाडे न परवडणारे आहे. लाडकी बहीण योजना व ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे. हा लाडक्या बहिणीवर अन्याय झाला आहे. अनेक एसटी खिळखिळ्या आहेत. कसलेही सुधारणा नसताना हे भाडेवाढ सर्वसामान्य जनतेसाठी चुकीचे आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एसटी सोडण्यात येईल, सहलीसाठी चांगल्या बसेस सोडण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यांनी अन्याय करू नये व अगोदरच त्रस्त असलेल्या जनतेवर लादलेली ही भाडे रद्द करावी. अन्यथा उमरगा बस स्थानकासमोर पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा आमदार स्वामी यांनी यावेळी दिला. यावेळी आगारप्रमुख कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रज्जाक अत्तर, रणधीर पवार, बसवराज वरनाळे, सुधाकर पाटील, भगवान जाधव, आप्पाराव गायकवाड, सदाशिव भातागळीकर, मारुती थोरे, विजयकुमार नागदे, शिवाजी गायकवाड, दत्ता शिंदे, विजयकुमार तळबोगे, महेश शिंदे, वैजनाथ काळे, प्रेमनाथ शहापुरे, महेश पाटील, शिवाजी कोकळे, महादेव काळे,वैशाली जाधव,हणमंत सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.