भूम (प्रतिनिधी)- साठे चौक भुम येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा च्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले सभासद नोंदणी करण्यासाठी साठे चौक येथे स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी भजपा कामगार मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली. समजातील सर्व घटकांना,वंचित लोकांना भारतीय जनता पार्टीला जोडण्यासाठी कामगार मोर्चा पदाधिकारी यांनी प्रयत्न करावे असे आवाहन नन्नवरे यांनी केले. तसेच जगातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये सामील होण्याची संधी नागरिकांना आहे. तरी सर्वांनी यात सामील होऊन सहकार्य करावे असे आवाहन जोतिबा नन्नवरे साहेब यांनी केले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या अलका ताई गौर ,प्रदेश कार्यकारणी सदस सचिन जी बारगजे, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहन जाधव ,भाजपा नेते मा जिल्हा सरचिटणीस आदम शेख,जिल्हा सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर, जनसेवा बँकेचे व्हॉईस चेअरमन जालिंदर तात्या मोहिते ,तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, मा तालुका उपाध्यक्ष अमोल बोराडे, पंचायत राज तालुका अध्यक्ष बिभीषण टाळके,मा उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष रमेश बगाडे,उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष संदीप खराडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश भोगील,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस संदीप महानवर,युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित पाटील, दुधोडी बूथ प्रमुख अशोक महानवर, निपाणी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्तफा पठाण, अशोक बोत्रे,बालाजी भोरे तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व स्तरातील युवक महिला जेष्ठ नागरिक यांची जवळपास 540 लोकांची सभासद नोंदणी करण्यात आली या नोंदणी अभियानास तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

 
Top