धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक  कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संवर्ग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर गुरूवार, 2 ते 4 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत गुरूवारी पार पडले. यावेळी नगरपरिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजितकुमार डोके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, धाराशिवचे मुख्याधिकारी वसुधा फड, उमरगा नगरपरिषद व लोहारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, परंडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, भूम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके, वाशी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कांबळे, तुळजापूर आणि नळदुर्गचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, मुरूम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भूजबळ उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दीबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नृत्य, गायन, नाटक, रांगोळी यांसह विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेतील विजेते विभागीय स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरविकास विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

 
Top