तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री  तुळजाभवानी सर्वाचेच दैवत असुन तिला मागावे लागत नाही. देविने महायुतीला सत्ता देवुन भरभरुन दिल्याने जनतेला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आमच्या नेत्यांना आशिर्वाद दे असे साकडे घालुन, मराठवाड्याचे हक्काचे पाणी केव्हा येणार हे सांगण्यास या प्रश्नाला बगल दिली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन घेतले. नंतर मंदीर समिती वतीने प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने यांनी सत्कार केला.


देवी दर्शन झाल्यावर त्यांनी पत्रकारास संवाद साधताना म्हणाले कि, मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील येणारे कृष्णा खोऱ्याचे पाणी याबाबत मी पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेईल. पंतप्रधान मोदी यांची संकल्पना दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी देशातील सर्व नद्या जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही. लाडक्या बहीण योजने बाबतीत विरोधक अफवा,पसरवत आहेत. डिसेंबरचा लाडके बहिणीला हप्ता मिळाला असून तसेच हप्ते चालू राहतील. राज्यातील विकास निधी पैसा या लाडकी बहीण योजनेला वळवला हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. 

आपण धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यास इच्छुक आहेत का असा प्रश्न केला असता यावेळेस पाटील म्हणाले की, हा प्रश्न मुख्यमंत्री यांचा असून ते जी माझ्यावर जबाबदारी देतील त्याला मी स्वीकारेल. कारण धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री होणे भाग्याचेच आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकटेच पदभार पाहत आहेत  असा आरोप केला असा प्रश्न विचारला त्यांनी आता शेती करावे असे यावेळी आरोपाला उत्तर देताना म्हणाले.

बीड जिल्ह्यामध्ये जातीचा राजकारण होत असून मराठा विरुद्ध वंजारी याबाबत आपले मत काय असे विचारणा केली असता मला असे वाटते की जातीचे समीकरण व राजकीय समीकरण ही वेगळे असून जो गुन्हेगार आहे त्याची जात न पाहता त्याला कायदेशीर शिक्षा होणे गरजेचे आहे. यामुळे येथे जातीचा प्रश्न निर्माण होत नाही.

 
Top