धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तालुकानिहाय नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन धाराशिव जिल्हयातील नागरीकांच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी परांडा, दिनांक 20 ऑगस्ट 2024 तुळजापूर, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी भूम, दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी उमरगा, दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी लोहारा, 28 ऑगस्ट 2024 रोजी वाशी, दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी कळंब तालुकास्तरीय आढावा बैठकीचे व दिनांक 11 /10/ 2024 रोजी फेर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये नागरीकांकडून मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विविध तक्रारीच्या अनुषंगाने निवारण करणेकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 09/01/2025 रोजी दु. 12.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परीसर धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत सर्व जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या समस्येची सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने ज्या नागरिकांनी तालुकास्तरावरील जनता दरबार मध्ये समस्या मांडल्या होत्या फक्त त्यांनीच उपस्थित राहावे. सर्व तालुक्यातील नागरीकांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थीत राहणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.

 
Top